Tilak Varma Argument : भारत-श्रीलंका सामन्यात तुफान राडा! तिलक वर्माचा अंपायरशी अन् वैभवचा श्रीलंकेच्या खेळाडूशी झाला वाद, पाहा VIDEO
Tilak Varma Argument : हा सामना केवळ 'टाय' झाला नाही, तर या सामन्यानंतर मैदानावर पंचांनी केलेल्या मूर्खपणामुळे, खराब प्रकाशाचा ड्रामा, भारतीय कर्णधार तिलक वर्माचा पंचांसोबत झालेला वाद यासाठी चर्चेत राहिला.

Tilak Varma Argument with Umpire IND A vs SL A Match : भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात खेळला गेलेला तिरंगी मालिकेतील सामना क्रिकेटच्या इतिहासात वादाचे नवीन पर्व म्हणून नोंदवला गेला आहे. हा सामना केवळ ‘टाय’ झाला नाही, तर या सामन्यानंतर मैदानावर पंचांनी केलेल्या मूर्खपणामुळे, खराब प्रकाशाचा ड्रामा, भारतीय कर्णधार तिलक वर्माचा पंचांसोबत झालेला वाद आणि शेवटी सुपर ओव्हरमधील पराभवानंतर खेळाडूंची धक्काबुक्की, असा भयंकर हाय-वोल्टेज ड्रामा मिनिटा-मिनिटाला पाहायला मिळाला. ज्याचे व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शेवटच्या चेंडूवर रनआऊट अन् ६ वाजताचा अंधारातील ड्रामा –
सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला २ धावा हव्या होत्या. गोलंदाज अर्शद खानच्या यॉर्करवर फलंदाज चमिका गुणसेकरा धावबाद झाला आणि सामना २६५ धावांवर टाय झाला. सामना संपला तेव्हा संध्याकाळचे ६ वाजून गेले होते आणि मैदानात प्रचंड अंधार झाला होता. टूर्नामेंटच्या नियमानुसार फ्लडलाइट्स (पूरके दिवे) वापरण्यास बंदी होती.
आता दोन्ही संघांना १-१ गुण वाटावे की सुपर ओव्हर घ्यावी, यावरून पंचांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या भारतीय कर्णधार तिलक वर्माने मैदानी पंचांना धारेवर धरले. त्यांच्यात बराच वेळ जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. अखेर पंचांनी सुपर ओव्हर घेण्याचा निर्णय घेतला.
अंपायरचा सर्वात मोठा ब्लंडर; खेळाडूंना डगआऊटमधून परत बोलावले!
🚨 Drama in Dambulla!
India A players, led by Tilak Varma, argued with umpires after the match vs Sri Lanka A ended in a tie, demanding a Super Over despite bad light.
Umpires eventually agreed. Pure chaos! 👀🏏#IndiaA #SriLankaA #Cricket pic.twitter.com/EwEvUg7Dvm
— Kunal Bhanwala (@bhanwala_k38130) June 15, 2026
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका आधी फलंदाजी करत होती. अर्शद खानने शेवटचा चेंडू टाकला आणि ओव्हर संपली असे समजून भारतीय खेळाडू मैदान सोडून डगआऊटमध्ये परतले. तेवढ्यात पंचांनी चक्क भारतीय खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले. यामुळे तिलक वर्माचा पारा चांगलाच चढला. तिसऱ्या पंचांनी तो चेंडू ‘नो-बॉल’ घोषित केला होता, त्यामुळे भारताला तो चेंडू पुन्हा टाकावा लागला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये १६ धावा कुटल्या.
सुपर ओव्हरमधील पराभव आणि खेळाडूंचा राडा –
आज जो यूपी वाले बिहार के वैभव पर सवाल उठा रहे हैं,वो खबर पूरी रखें।
पाकिस्तानी खिलाड़ी भी कभी ऐसे ही बदतमीजी किया था, वैभव के बल्ले ने जवाब तगड़ा दिया था।आज सुपर ओवर में भारत की हार के बाद दोनों खिलाड़ी शांति से वापस आ रहे थे, तो छेड़ने कौन आया पहले??
कुछ लोग ये भी बोल रहे हैं… https://t.co/nfcR99Dkw0 pic.twitter.com/OUaM00nXSF— Priya Mishra (@Kashyap_Priyu) June 15, 2026
१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ दडपणाखाली कोलमडला. श्रीलंकेच्या कुघातास मथुलनच्या फिरकीसमोर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे केवळ ९ धावा करू शकले. श्रीलंकेने सामना जिंकताच मैदानावरील तणावाचा स्फोट झाला. १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूंशी थेट भिडला. त्यांच्यात तीव्र धक्कामुक्की सुरू झाली, जी नंतर वरिष्ठ खेळाडूंनी मध्यस्थी करून शांत केली.





