फिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाज बुडाली

31 जणांचा मृत्यू; 62 जणांना वाचवण्यात यश
मनिला – फिलिपिन्सच्या समुद्रात सुरू असलेल्या भयानक वादळांमुळे उठत असलेल्या अजस्त्र लाटांनी तीन जहाज बुडाले असून या जहाजांवरील 31 जणांचा मृत्यू झाला असून 62 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यावेळी कोस्ट गार्डचे प्रवक्ते अरमंड बालिलो यांच्या मते या जहाजांमध्ये जास्त करून गुइमारस आणि इलोइलो प्रांतातील लोक होते. हवामानाची स्थिती चांगली नसल्याने ही जहाज बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या जहाजावरील 62 प्रवासी आणि क्रू मेंबर्सला सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. तर, तिसऱ्या जहाजातील पाच क्रू मेंबर्सला बचावण्यात आलं आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला आणि जहाज हेलकावे खाऊ लागले. त्यानंतर एक मोठी लाट आली आणि जहाज उलटले, असे एका प्रत्यक्षदर्शीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हवामान खात्याने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचीही माहिती दिली होती.



