North Korea : उत्तर कोरियाच्या विनाशिकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी

सेऊल – उत्तर कोरियाने अलिकडेच जलावतरण केलेल्या नवीन विनाशिकेवरून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी आज घेतली. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन हे स्वतः या चाचणीच्या वेळी उपस्थित होते. लढाऊ जहाजांवरून अण्वस्त्रे डागण्याच्या क्षमतेसाठी ही चाचणी घेण्यात आली.
उत्तर कोरियाने अलिकडेच ५ हजार टन वजनाची विनाशिका देशाच्या नौदलाच्या ताप्यामध्ये समाविष्ट केली असून देशाच्या उत्तरेकडील नाम्पो बंदरात या विनाशिकेचे जलावतरण करण्यात आले. ही विनाशिका उत्तर कोरियाची पहिली विनाशिका असून ती कदाचित रशियन मदतीने बांधली गेली असावी, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर कोरियाचे नौदल दक्षिण कोरियाच्या तुलनेत मागे आहे, परंतु तरीही ही विनाशका एक गंभीर सुरक्षा धोका असू शकते. कारण उत्तर कोरियाच्या आक्रमण आणि संरक्षण क्षमतांना या विनाशिकेमुळे बळकटी मिळू शकते, असे देखील त्यांचे म्हणणे आहे
किम यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला या विनाशिकेच्या सुपरसॉनिक आणि स्ट्रॅटेजिक क्रूझ क्षेपणास्त्रे, विमानविरोधी क्षेपणास्त्रे, स्वयंचलित तोफा आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग गनच्या चाचण्या देखील पाहिल्या आहेत.
त्यांनी जहाजातील शक्तिशाली स्ट्राइक शस्त्रे आणि पारंपारिक संरक्षणाच्या संयोजनाचे कौतुक केले आणि त्यांच्या नौदलाच्या अण्वस्त्रसज्जतेला गती देण्यासाठी उद्दिष्टे निश्चित केली,





