Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार : अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar : पुणे शहर आणि जिल्ह्याची हद्द आता वाढलेली आहे. पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड आणि हडपसरच्या पुढे असणारा भाग वाढत आहे. पुणे महापालिकेची हद्द वाढवून यामध्ये नव्या गावांना समाविष्ठ करण्यात आले. मात्र, इतर वाढलेल्या भागांचे काय? हा प्रश्न अनुउत्तरीत होता. यासंदर्भात आता अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील पुणे -नाशिक आणि तळेगाव -शिक्रापुर या दोन महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपायोजनांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता एक मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
पुणे शहराला सर्वात जास्त भेडसावणारी गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि अॅाटो हब बनल्यामुळे अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीचा उडलेला फज्जा. या गोष्टी पूर्णपणे सोडविण्यासाठी येथील स्थानिक ग्रामपंचायती सक्षम नाहीत. यामुळेच अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणारा असल्याची मोठी घोषणा केली आहे.
या भागांसाठी असणार महापालिका
चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
अजित पवारांकडून आढावा
अजित पवारांनी स्वतः पुणे -नाशिक आणि तळेगाव -शिक्रापुर या दोन महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी हजर होते. यावेळी अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच चाकणमध्ये महापालिका आणण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. चाकणला महानगर पालिका करायचं चाललंय, असं ते म्हणाले होते.





