Government Holiday : दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द! शासनाचा मोठा निर्णय, त्या ऐवजी या सणांना मिळणार सुट्टी

Government Holiday : महाराष्ट्र राज्य सरकारने दोन सट्ट्यांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. याबाबत नुकतचं नवीन सुट्ट्यांचे परिपत्रक शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार हे बदल सरकारी कार्यालये, शाळा आणि कॉलेजला लागू असणार आहेत. त्यानुसार नारळी पोर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी पोर्णिमेला सुट्टी मिळणार आहे.
गोपाळकाला १६ ऑगस्टची सुट्टी नारळी पोर्णिमेला म्हणजे आज देण्यात आली आहे. तर अनंत चतुर्दशीची म्हणजे ६ सप्टेंबरची सुट्टी रद्द करुन ती गौरी विसर्जनाच्या दिवशी देण्यात आली आहे. परंतु, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अनंत चतुर्दशीला सुट्टी राहू द्या, अशी मागणी गणेशोत्सव समितीकडून करण्यात आली आहे. यामुळे याबाबत काही निर्णय होतो हे पाहावे लागेल.
सध्या तरी स्थानिक सिटी मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. खरंतर येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेल्या आहे. हा उत्सव मुंबईकर मोठ्या उत्सहात दरवर्षी साजरा करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते.
आता गणपती विसर्जनाच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार नसल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. याचसोबत दहीहंडीच्या दिवशीही अनेकजण घराबाहेर पडतात. या दिवशीची सुट्टी रद्द करुन ती सुट्टी नारळी पोर्णिमेला देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.





