Pune : गायकवाड कुटुंबातील तिघांना पोलीस कोठडी
Updated On:

पुणे- आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग केला. तसेच खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकावणे, खासगी सावकारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबातील तिघांना न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (70), त्याची पत्नी आणि मुलगा गणेश ऊर्फ केदार यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेले गायकवाड बाप-लेक फरार होते. पुणे पोलिसांनी त्यांना बुधवारी कर्नाटकातून अटक केली.





