Accident : ट्रक व बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू; बुलढण्यातील भीषण अपघातात 20 जण जखमी
Updated On:

बुलढाणा – येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये ही भीषण टक्कर झाली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहितीनुसार, मध्य प्रदेश परिवहनची बस अचानक एका ट्रकला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की ट्रक आणि बसच्या पुढच्या भागांचा चक्काचूर झाला.
या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधील 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





