पुण्यात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू
Updated On:

पुणे : पुण्यात मागील चोवीस तासात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात एका ५२ वर्षाच्या पुरुषाचा असून एका ६० वर्षाच्या आजीचा देखील समावेश आहे. दरम्यान पुणे शहरात रविवारी १७ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०३ वर पोहचला आहे.





