नागपूरमध्ये विहिरीत कार कोसळून तिघांचा मृत्यू; ब्रेक ऐवजी दाबले एक्सीलेटर अन् घडली दुर्घटना
Updated On:
नागपूर : कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. नागपुरातील बोटीबोरी परिसरात हा अपघात घडला. वाहन चालवायला शिकताना नियंत्रण सुटल्याने कार थेट कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. कारमध्येच अडकल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.
बुटीबोरी एमआयडीसीतील बालभारतीच्या मोकळ्या मैदानात अनेक जण गाडी शिकतात. या मैदानात कठडे नसलेली एक विहीर आहे. घटनेतील तीघे मृतकही नव्या गाडीत बसून कार शिकत होते. कार शिकताना शिकावू मित्राने ब्रेक ऐवजी चुकून अॅक्सीलेटरवर पाय ठेवला. त्यामुळे गाडीचा वेग वाढल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार थेट विहिरीत कोसळली. यात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
टॅग्स:





