Gujarat Election 2022 : मोदींच्या सभा स्थानाजवळ ड्रोन उडवणारे तिघे अटकेत

बावला (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बावला दौऱ्यादरम्यान प्रतिबंधित भागात ड्रोन उडवल्याबद्दल तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तीन लोक सभास्थळाजवळील मुख्य रस्त्यावरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते.
सभेजवळील दोन किलोमीटरचा संपूर्ण परिसर नो ड्रोन फ्लाइंग झोन म्हणून अधिसूचित करण्यात आला होता. त्या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून या तीन जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
निकुल रमेशभाई परमार (24), राकेश कालूभाई भारवड (35), राजेशकुमार मांगीलाल प्रजापती (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे ड्रोन उडवले जात असतानाच ड्रोन चालकांना पकडून ड्रोन खाली उतरवण्यास सांगण्यात आले होते. तिघांनी त्याचे पालन केले आणि ड्रोन खाली घेतला.
इतिहासाचे पुनर्लेखन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही – अमित शहा
बीडीडीएस टीमने ताबडतोब ड्रोनची तपासणी केली. त्यावेळी हे ड्रोन फक्त चित्रीकरणासाठी वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात ऑपरेटींग कॅमेरा होता, त्यात कोणतीही स्फोटके किंवा इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नव्हती, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.





