nagar | मुलीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी

श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- एका अल्पवयीन मुलीस मोबाईल करून बोलावून घेऊन तिचा विनयभंग केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलगी., तिची आजी, आई व बहिणीला आरोपी तरुणाच्या आई, भाऊ व बहिणीने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सोहेल अजीज पठाण याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील सोहेल अजीज पठाण (वय १९) याने एका अल्पवयीन मुलीस भेटायला येण्याचे सांगितले. जर भेटण्यास आली नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. अल्पवयीन मुलगी घाबरून आरोपीस भेटायला गेली असता अल्पवयीन मुलीस आरोपी तरुणाने शाररिक सुखाची मागणी करत विनयभंग केला.
मुलीने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेला. काही वेळाने त्या तरुणाचा भाऊ अरबाज, आई सायरा पठाण, बहीन रेश्मा आदींनी पीडित मुलीच्या घरी येऊन पीडित मुलगी, तिची आई, बहीण व आजी यांना लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.





