Hasan Mushrif : “आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि…”; मुश्रीफांचा बंडखोरांना इशारा, समरजितसिंह घाटगे म्हणाले…
Hasan Mushrif : "जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच" असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी करणाऱ्यांना दिला आहे.

Hasan Mushrif : “जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच” असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी करणाऱ्यांना दिला आहे. ते कोल्हापूर येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
मुश्रीफांनी केलेल्या विधानानंतर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; शंकांचे होणार निरासन
ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महत्वाचा टप्पा मानली जाते. या निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर हाचलालींना वेग आला असून, अनेक नाराजांनी बंडाचे निशाण फडकवल्याचे चित्र आहे.
“कार्यकर्त्यांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तिन्ही नेत्यांना पुन्हा तोंड दाखवायचे आहे. काम करुन घेण्यासाठी, विकासासाठी तुम्हाला याच नेत्यांना तोंड दाखवायचे आहे.” असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, “माझा बुथ सब से मजबूत, हे दाखवण्याची हीच संधी आहे. आता कोणीही तक्रार करायची नाही. तिघांचा मिळून मंडप आहे. तिघांची मुलं नवरे आहेत, तिघांच्या मुली मंडपात आहेत, आता तिघांनी मिळून कष्ट करायचे आहेत. कुठलंही किल्मिष मनात ठेवायचे नाही,” असे आवाहन त्यांनी प्रचार सभेतून केले आहे. आता या आवाहनाला कार्यकर्ते कशी साद देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
या प्रचारसभेतून समरजितसिंह घाटगे यांनी देखील बंडखोरी करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. कोणतीही बंडखोरी खपवून घेणार नाही. ज्यांनी बंडखोरी करून पक्ष किंवा गट सोडला त्यांना परत घेतलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
तसेच ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले आहेत, त्यांनी माघार घेऊन या प्रवाहामध्ये आमच्या सोबत यावे, असे आवाहन समरजित घाटगे यांनी केले आहे.
हेही वाचा : Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत धक्कादायक वाढ; अवघ्या एका वर्षात तब्बल 13,000 कोटींची भर






