Malaysia : जॉबसाठी मलेशियाला जाणाऱ्यांनो, थांबा.! भारताने दिली महत्त्वाची सूचना
व्हिसा मुक्त प्रवेश सुविधेतून मलेशियात जाणाऱ्यांनी केवळ ३० दिवस तेथे राहणे अपेक्षित असल्याचे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.

Malaysia – मलेशियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी मलेशियाच्या व्हिसा-मुक्त प्रवेश सुविधेचा वापर करू नये, अशी सूचना भारत सरकारने मलेशियातील भारतीय रहिवाशांना केली आहे. कुआलालंपूर येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर या संदर्भातली मार्गदर्शक सूचना पोस्ट केली आहे.
गैरहेतू असलेल्या एजंटांकडून दिशाभूल झालेले मलेशियामध्ये येत असलेल्या भारतीयांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मलेशियामध्ये चांगली नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने या भारतीय युवकांना मलेशियात नेले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नोकरी मिळवून व्हिसाची मुदत उलटून गेल्यानंतरही जीर्घकाळ या युवकांना मलेशियातच रहावे लागते. हे इमिग्रेशन कायद्याचे उघड उल्लंघन आहे. व्हिसा मुक्त प्रवेश सुविधेतून मलेशियात जाणाऱ्यांनी केवळ ३० दिवस तेथे राहणे अपेक्षित असल्याचे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
३० दिवसांच्या व्हिसा मुक्त प्रवेश सुविधेचा वापर पर्यटन आणि सामाजिक भेटींसाठी होणे अपेक्षित आहे. याचा वापर रोजगार मिळवण्यासाठी केला जाणे अपेक्षित नाही, असेही दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





