जिओच्या ऑपरेटिंग सिस्टमसह येणारा पहिला स्मार्ट टीव्ही लाँच, किंमत फक्त…

Thomson New Smart TV | Thomson ने भारतीय बाजारात नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीने या 43 इंच स्मार्ट टीव्हीला JioTele OS सह लाँच केले आहे. जिओच्या ऑपरेटिंग सिस्टमसह येणारा हा पहिला स्मार्ट टीव्ही आहे. काही दिवसांपूर्वीच जिओने स्मार्ट टीव्हीसाठी ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली होती. या ऑपरेटिंग सिस्टमला भारतीय यूजर्सला लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. Thomson च्या या नवीन स्मार्ट टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Thomson स्मार्ट टीव्हीची किंमत
Thomson च्या 43 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत 18,990 रुपये आहे. या टीव्हीला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. लाँच ऑफर अंतर्गत टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना JioHotstar, JioSaavn आणि JioGames चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Thomson स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स
Thomson च्या या टीव्हीमध्ये 43 इंच स्क्रीन देण्यात आली असून यात HDR सपोर्ट, 4K रिझॉल्यूशन आणि 500 Nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. टीव्ही स्लिम बेझल आणि एलॉय स्टँडसह येतो. यात Amlogic प्रोसेसरसह 2GB RAM आणि 8GB स्टोरेज दिले आहे.
यामध्ये 40 वॉटचा स्टीरियो स्पीकर दिला असून, यामध्ये डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट मिळेल. याशिवाय, स्टँडर्ड, स्पोर्ट, मूव्ही आणि म्यूझिक सारखे साउंड मोड्स दिले आहेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, तीन HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट मिळतील.
हा JioTele OS सह येणारा पहिला स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीमध्ये Jio Store चा सपोर्ट दिला आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला विविध अॅप्स डाउनलोड करता येईल. यात नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार आणि युट्यूब असे वेगवेगळे बटन्स मिळतील. याशिवाय, 10 वेगवेगळ्या भाषेत कंटेंट सर्च करण्याचीही सुविधा दिली आहे.





