घरच्या घरी थिएटरचा अनुभव! भारतात लाँच झाली ‘ही’ शानदार स्मार्ट टीव्ही सिरीज, पाहा किंमत

Haier Smart TV Launch | Haier ने भारतीय बाजारात आपली नवीन मिनी LED 4K स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे. M80F या नावाने सादर झालेल्या या सीरिजमध्ये 55 इंच, 65 इंच, 75 इंच आणि 85 इंचाचे टीव्ही मॉडेल्स उपलब्ध आहेत.
मिनी LED तंत्रज्ञानामुळे या टीव्हीमध्ये अधिक गडद काळा रंग, जास्त ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. या सिरीजमध्ये HDR10 आणि डॉल्बी व्हिजन IQ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे शानदार व्हिज्युअल अनुभव घेता येईल.
Haier स्मार्ट टीव्हीचे फीचर्स
हायर M80F सिरीजचे मिनी LED 4K स्मार्ट टीव्ही 55 इंच, 65 इंच, 75 इंच आणि 85 इंच स्क्रीनसह येतात. या टीव्हीमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट, 800 निट्सचा पीक ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन IQ, मिनी LED आणि MEMC तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याद्वारे शानदार व्हिज्युअल अनुभव मिळतो. या टीव्हीच्या स्क्रीनला डोळ्यांच्या संरक्षणासाठी TÜV लो ब्लू लाईट सर्टिफिकेट देखील मिळाले आहे.
या नवीन टीव्हीमध्ये KEF ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे, जी ‘सिनेमा-क्वालिटी साउंड’ प्रदान करते. हे टीव्ही ‘अल्ट्रा-रिस्पॉन्सिव्ह’ गेमिंगचा अनुभव देखील देतात. डॉल्बी एटमॉस आणि dbx-tv सपोर्टसोबत सबवूफर देखील यात आहे.
हायर M80F सिरीजचे मिनी LED 4K टीव्ही DLG (ड्युअल लाईन गेट), ALLM (ऑटो लो लेटेंसी मोड) आणि VRR (व्हेरिएबल रिफ्रेश रेट) ला सपोर्ट करतात, ज्यामुळे गेमिंगचा शानदार अनुभव मिळतो.
Haier स्मार्ट टीव्हीची किंमत
हायर M80F सिरिजच्या मिनी LED 4K स्मार्ट टीव्हीची भारतातील किंमत 57,990 रुपयांपासून सुरू होते. कंपनीने सांगितले की, हे नवीन टीव्ही देशभरातील निवडक रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.




