मोठ्या स्क्रीनसह येणारे दमदार स्मार्ट टीव्ही, किंमत 12 हजारांपेक्षा कमी; डिटेल्स एकदा पाहाच

Best Smart TVs | मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील, असा विचार करत असाल तर थोडे थांबा. बाजारात कमी किंमतीत मोठी स्क्रीन आणि दमदार फीचर्ससह येणारे अनेक शानदार टीव्ही उपलब्ध आहे. अवघ्या 12 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही हे टीव्ही खरेदी करू शकता. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्ट एलईडी टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Realme TechLife CineSonic Q
Realme च्या या 32 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त 10,299 रुपये आहे. या टीव्हीला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. यामध्ये 32 इंच एचडी रेडी क्यूएलईडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन 1366 x768 पिक्सल, रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. टीव्हीमध्ये 40 वॅटचा साउंड आउटपुट दिला आहे. तसेच, डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट मिळतो. हा टीव्ही मीडियाटेक क्वाड-कोर प्रोसेसरसह 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे.
SAMSUNG 80 cm (32 Inch) HD Ready LED Smart Tizen TV
सॅमसंगच्या या टीव्हीची किंमत 11,990 रुपये आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून या 32 इंच स्मार्ट टीव्हीला खरेदी करू शकता. टीव्ही आकर्षक बेझल-फ्री डिझाइनसह येते. यामध्ये 1366 x 678 पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा एचडी रेडी डिस्प्ले मिळेल. याशिवाय, 20 20 वॉट्स साउंड आउटपूट आणि डॉल्बी सपोर्टमुळे टीव्ही पाहताना खूपच शानदार अनुभव मिळतो. टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
Acer G plus Series 80.01 cm (32 inch) HD Ready LED Smart
Acer च्या या 32 इंच फ्रेमलेस डिझाइनसह येणाऱ्या टीव्हीची किंमत 10,999 रुपये आहे. यामध्ये 32 इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन 1366 x 678 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. यामध्ये तुम्हाला 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देखील मिळते. याशिवाय, 24 वॅटचा साउंड आउटपूट सपोर्ट दिला आहे.




