नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचाय? पाहा ‘हे’ तीन जबरदस्त पर्याय, किंमत 14 हजारांपेक्षा कमी

Best Smart TV Offer | तुम्ही 14,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये एक नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या Flipkart वर मोटोरोला, LG आणि थॉमसन या लोकप्रिय ब्रँडचे स्मार्ट टीव्ही अत्यंत आकर्षक दरात उपलब्ध आहेत.
या टीव्हीमध्ये दमदार साउंड, HD ते Full HD पर्यंतचा डिस्प्ले, स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टीम, तसेच आधुनिक आणि फ्रेमलेस डिझाईनसारखी वैशिष्ट्ये मिळत आहेत. या टीव्हींवर बँक ऑफर्स आणि डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल.
LG LR57 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV
LG चा LR57 HD रेडी LED WebOS टीव्ही 32 इंचाचा असून यामध्ये 1366×768 रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि AI Brightness Control चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा टीव्ही अल्फा 5 Gen 6 AI प्रोसेसरवर काम करतो आणि 10W साउंड आउटपुट देतो. यामध्ये WebOS ऑपरेटिंग सिस्टीमसह सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि बिल्ट-इन Wi-Fi सारखी फीचर्स मिळतात. या टीव्हीची किंमत 13,990 रुपये आहे.
MOTOROLA 80 cm (32 inch) QLED HD Ready Smart Google TV
मोटोरोला QLED HD रेडी Google स्मार्ट टीव्ही 32 इंचाचा टीव्ही 1366×768 रिझोल्यूशनसह येतो आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 20W साउंड आउटपुट, डॉल्बी ऑडिओ सपोर्ट, 1.5GB RAM, 8GB स्टोरेज आणि क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर मिळतो. हा Google टीव्ही बिल्ट-इन Chromecast आणि व्हॉइस असिस्टंटसह येतो. Flipkart वर याची किंमत10,490 रुपये असून, बँक ऑफरद्वारे 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Thomson Alpha 100 cm (40 inch) Full HD LED Smart Linux TV
तुम्हाला मोठ्या स्क्रीनसह येणारा टीव्ही हवा असेल, तर Thomson Alpha 40 इंचाचा Full HD LED टीव्ही (40Alpha009BL) 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1920×1080 रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 30W साउंड आउटपुट आणि फ्रेमलेस डिझाईन मिळते. हा टीव्ही Linux OS वर आधारित असून, बिल्ट-इन Wi-Fi आणि Miracast सारख्या स्मार्ट फीचर्ससह येतो. या टीव्हीसाठी सुद्धा 1,000 रुपये पर्यंत बँक डिस्काउंट मिळू शकतो.





