यंदाचा योग दिवस अमृता खानविलकरसाठी ठरला खास; केदारनाथचं दर्शन घेत…

Amruta Khanwilkar | अभिनेत्री अमृता खानविलकर फिट राहण्यासाठी नियमितपणे योगा करते. धावपळीच्या आयुष्यात अमृता योगाला अधिक प्राधान्य देते, हे अनेकदा तिने मुलाखतींदरम्यान सांगितले आहे. यंदाचा योग दिन अमृतासाठी खास ठरला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे.
केदारनाथचं दर्शन घेऊन अमृताने हा योग दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “गेल्या काही वर्षांत योगाचा सराव करताना एक गोष्ट माझ्या हृदयात खोलवर उतरली आहे ती म्हणजे ‘Yoga is not just about movement of the body it’s equally about the stillness of the mind.’ शांतता आपल्याला अधिक समजूतदार बनवते आपले निर्णय घ्यायला आणि ते स्वीकारायला शिकवते आणि जे आपल्याला पुढे नेत नाही, त्याला सौम्यतेने सोडून द्यायचं धैर्य देते.
View this post on Instagram
यंदा मात्र मनात वेगळीच ओढ होती. दैनंदिन सराव जितका महत्त्वाचा आहे. तितकंच अधूनमधून सर्व काही बाजूला सारून स्वतःसाठी एखादा अनुभव शोधायला निघणंही आवश्यक असतं. एक असा अनुभव जो आपल्याला अधिक खोलवर रुजवतो आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे केदारनाथ यात्रा. केदारनाथ यात्रेत खरी जादू तेव्हा घडली सकाळी साडेतीन वाजता, ब्रह्ममुहूर्तावर आम्हाला केदारनाथ मंदिरात दर्शन मिळालं. बाहेर येऊन योगासन करत हा सुंदर क्षण अनुभवायला मिळणं अगदीच स्वप्नवत होत. प्रत्येकासाठी केदारनाथ वेगळं असतं. प्रत्येकाला भेटतो तिथे आपलाच एखादा जादुई क्षण असतो. Amruta Khanwilkar |
माझा क्षण मला मिळाला. आता तो क्षण मी माझ्यासोबत घेऊन परतले आहे माझ्या श्वासात, माझ्या साधनेत आणि माझ्या प्रत्येक शांत अस्तित्वात,” असा अनुभव अमृताने शेअर केला आहे. योग साधनेचा एक नवा अध्याय तिकडे जाऊन अनुभवला असल्याचेही अमृताने म्हंटले आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील दिसत आहे. Amruta Khanwilkar |
हेही वाचा:
“देशात अस्थिरता वाढत असताना योग शांततेचा मार्ग दाखवू शकतो,” विशाखापट्टणममधून PM मोदींचा संदेश





