“देशात अस्थिरता वाढत असताना योग शांततेचा मार्ग दाखवू शकतो,” विशाखापट्टणममधून PM मोदींचा संदेश

International Yoga Day | पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीचवर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. यावेळी मोदींनी ३ लाखांहून अधिक लोकांसोबत येथे योगा केला, सोबतच योगाचे महत्व सांगितले. जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी योगाला एक जनआंदोलन बनवू या. या आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल, असे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “आज संपूर्ण जग तणाव आणि अशांततेतून जात आहे. अनेक देशात अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवू शकतो. योग हे असे बटण आहे, जे मानवाला श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा नव्या दमाने पुढे जाण्यासाठी क्षणभर विश्रांती प्राप्त करून देतो.”
#WATCH | “Rising obesity is a global challenge. I had discussed this issue in detail during the Mann Ki Baat programme. To address it, I had also launched a challenge to reduce oil consumption in our food by 10%. Once again, I urge people across the world to join this challenge.”… pic.twitter.com/8c4fZPjPPu
— DD News (@DDNewslive) June 21, 2025
;
‘योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला’
पुढे ते म्हणाले, “गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा, असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी जगभरातील १७३ देशांनी आपणास पाठिंबा दिला. आजच्या जगात असा पाठिंबा मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता, तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आता ११ वर्षांनंतर आपण पाहतो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.” International Yoga Day |
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी ११ व्या योग दिनासाठी विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीचवर सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. हा समुद्रकिनारा केवळ अद्भुत नाही तर येथे स्वामी रामकृष्ण मठ देखील आहे. येथे वर्षभर पर्यटकांची मेळा भरतो. स्वामी रामकृष्ण परमहंसजींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ध्यान, योग आणि शिक्षणात घालवले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रामकृष्ण समुद्रकिनारा ४ किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून भोगापुरमपर्यंत सुमारे २६ किलोमीटरचा एक भव्य कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. International Yoga Day |
हेही वाचा :
आळंदी देवस्थान संस्थेच्या विश्वतांची गैरवर्तणूक; वारकऱ्यांचा आरोप, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?





