यंदा महायुतीचे; 2029 मध्ये एकट्या भाजपचे सरकार; अमित शहांच्या दाव्याने महायुतीत खळबळ
Updated On:

मुंबई : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे व त्यानंतर 2029 मध्ये केवळ भाजपचे सरकार येईल. ते सरकार एकट्या कमळाचे असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केला.
अमित शहा यांच्या या विधानामुळे महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांच्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे 2029 मध्ये केवळ भाजपचेच सरकार येणार असेल तर या 2 पक्षांचे काय होणार? असा सवाल या प्रकरणी उपस्थित होत आहे.





