‘यामुळे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार’ – सचिन सावंत

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर राजकारण तापले आहे. त्यातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याच मुद्यावरून ट्विट करत मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. सचिन सावंत यांनी ”मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत” असा खोचक टोला पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.
१/७ वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे
मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे pic.twitter.com/eDfnfKUPsW— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 15, 2022
सचिन सावंत यांचे ट्विट
‘गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे. असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून GSPC ला १० हजार कोटींचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे साठा काय तर गॅसच नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले”





