इटलीतील ‘या’ गावात आहे स्वतःचा सूर्य ! महाकाय आरशांचा वापर करून केली प्रकाशाची निर्मिती

Viganella – पृथ्वी ही वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थितीने निर्माण झाली आहे. या विशेष परिस्थितीमुळेच अनेक प्रदेशातील काही गावांना नैसर्गिक साधनसंपत्तीपासून वंचित राहावे लागते. इटली स्वित्झर्लंड सीमेवरील एका गावाला सुद्धा या गावातील महाकाय पर्वतांमुळे सूर्याच्या प्रकाशाचा थेट लाभ मिळत नव्हता.
या गावामध्ये नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेहमीच कमी प्रकाशाचा किंवा अंधाराचा सामना करावा लागत होता. या गावातील गावकऱ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतःचा सूर्य तयार केला आणि आता या गावकऱ्यांना नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुद्धा चांगला सूर्यप्रकाश मिळत आहे.
इटली स्वित्झरलँड सीमेवरील या गावाचे नाव ‘विगनेला’ असे असून त्या गावाची लोकसंख्या फक्त 200 आहे पण हे गाव खोल दऱ्यांमध्ये वसले असल्याने आणि आजूबाजूला उंचच उंच डोंगर असल्यामुळे सूर्याचा प्रकाश या गावामध्ये थेट येत नव्हता त्यातच थंडीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तर या गावांमध्ये अंधार सदृश परिस्थितीच असायची 2006 मध्ये या गावाने या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे या गावाच्या भोवताली असलेल्या सर्वात उंच अशा डोंगरावर 40 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक महाकाय आरसा बसवण्यात आला सूर्याची किरणे या आरशावर पडली कि ती परावर्तित होऊन त्याचा प्रकाश गावावर पडायचा आणि लोकांना सूर्यप्रकाशाचा लाभ व्हायचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावकऱ्यांनी इतरही छोट्या मोठ्या डोंगरांवर अशाच प्रकारे आरसे बसवले त्यामुळे आता गेल्या काही वर्षांपासून गावाला सूर्यप्रकाशाचा व्यवस्थित लाभ होत आहे.
एक प्रकारे या गावकऱ्यांनी विज्ञानाचा वापर करून स्वतःच्या सूर्याचीच निर्मिती केली आहे. विगनेला गावचे मेयर फिअरफ्रांक मिडाली यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला त्यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी काढून तब्बल एक कोटी रुपये जमवले हे महाकाय आरसे खरेदी करून ते पर्वतावर व्यवस्थितपणे बसवणे हे एक अवघड आणि खर्चिक काम होते.
आरशांची देखभाल ही करावी लागते गावकऱ्यांना सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे त्यांनी वर्गणीच्या माध्यमातून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. मुख्य पर्वतावर जो आरसा बसवण्यात आला आहे. तो संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेप्रमाणे या आरशाची दिशाही बदलते आणि गावाच्या गावाच्या मुख्य भागांमध्ये सूर्यकिरणे परावर्तित होऊन प्रकाश देऊ शकतात.





