T20 World Cup 2024 : यावेळी वेस्ट इंडिज जिंकू शकतो T20 विश्वचषकाचं विजेतेपद, ‘या’ 3 कारणांमुळे होऊ शकतो चॅम्पियन…

T20 World Cup 2024 : यंदा 20 देशांचे संघ विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. स्पर्धेची पातळी पूर्वीपेक्षा जास्त असेल आणि काही नवीन संघांच्या आगमनाने क्रिकेटचा खेळही नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज होईल. बरं, जर आपण तथ्यांबद्दल बोललो तर, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोनच संघ आहेत ज्यांनी दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. वेस्ट इंडिज संघाची कमान रोव्हमन पॉवेलकडे असेल. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज 2024 मध्ये तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा दावेदार का दिसत आहे, हे जाणून घेऊया.
1. अष्टपैलू खेळाडूंची मुबलकता : टी-20 एक असा फॉरमॅट आहे ज्यामध्ये अष्टपैलू खेळाडू खूप महत्वाचे असतात. कारण एक अष्टपैलू खेळाडू संघाला केवळ फलंदाजीतच सखोलता देत नाही तर गोलंदाजीतही अधिक पर्याय उपलब्ध करून देतो. वेस्ट इंडिजकडे फक्त एक-दोन नाही तर सात खेळाडू आहेत जे बॉल आणि बॅट अशा दुहेरी कामगिरीसह विरोधी संघाला घाम फोडू शकतात. कर्णधार रोव्हमन पॉवेलपासून ते आंद्रे रसेल, रोस्टन चेस आणि रोमॅरियो शेफर्डसारखे स्फोटक अष्टपैलू खेळाडू, ते कोणत्याही परिस्थितीत उत्तुंग असे षटकार मारण्यास सक्षम आहेत.
2. अनेक फलंदाज जबरदस्त फॉर्मात : वेस्ट इंडिजचे अनेक फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. निकोलस पूरनबद्दल सांगायचे तर, त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात 25 चेंडूत 75 धावा केल्या. या खेळीत 8 षटकारांचाही समावेश होता. याआधी आयपीएलमध्ये 499 धावा केल्यानंतर तो वेस्ट इंडिजच्या संघाचाही भाग बनला होता. शिमरॉन हेटमायर मधल्या फळीतील फलंदाजी मजबूत करेल. कर्णधार रोव्हमन पावेल अनेक दिवसांपासून सहाव्या क्रमांकावर येऊन संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पॉवेल चौकारांपेक्षा षटकार मारणे पसंत करतो.
3. होम एडवांटेज (घरच्या मैदानाचा फायदा) : टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही यजमान देश चॅम्पियन बनू शकलेला नाही. पण वेस्ट इंडिज हा असा संघ आहे जो जगातील कोणत्याही मैदानावर जाऊन विरोधी गोलंदाजीविरूध्द कहर करू शकतात. एकीकडे रोव्हमन पॉवेल अँड कंपनीला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असून त्यांना चाहत्यांचाही पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की वेस्ट इंडिजचा अमेरिकेत ‘गट टप्प्यात’ एकही सामना होणार नाही, ज्यामुळे त्यांना ट्रॉफी उचलणे सोपे होऊ शकते.
दरम्यान, वेस्ट इंडिज संघात ऑलराऊंडर्सला अधिक संधी देण्यात आली आहे. रोव्हमन पॉवेल,जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, शाई होप, निकोलस पूरन या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर आंद्रे रसेल, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड अशा स्टार ऑलराऊंडरला संघात स्थान देण्यात आलंय. तसेच अल्झारी जोसेफ, अकेल होसेन, गुडाकेश मोती, रोमॅरियो शेफर्ड, शामर जोसेफ अशा गोलंदाजांना वर्ल्ड कपमध्ये मोठी संधी दिली आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ – रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.





