Abhijit Dipke : “…हा पैसा शाळांच्या सुधारणेसाठी वापरता आला असता”; दिपकेंचा मुख्यमंत्री फडणविसांवर निशाणा
Abhijit Dipke : गावातील सरकारी शाळांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी सीजेपीचे नवं अभियान सुरू

Abhijit Dipke : छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला मोठा प्रतिसादही मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणी मोठंमोठे बॅनरही झळकले. यावरुन कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी नुकताच माझ्या गावी पोहोचलो आणि जिथे जिथे नजर जाते, तिथे तिथे देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर दिसत आहेत. ‘तिरंगा रॅली’चे स्वागतच आहे, पण त्यासाठी सर्वत्र एवढे मोठे बॅनर लावण्याची खरोखर गरज आहे का? त्याऐवजी, हा पैसा ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता,” असे दिपके म्हणाले.
Just landed in my hometown, and everywhere I look, there’s a Devendra Fadnavis banner.
The Tiranga Rally is welcome, but does it really need huge banners everywhere? This money could be better spent on improving schools in rural areas.
While students in rural Maharashtra are… pic.twitter.com/nyWJuPZ2Qs
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 14, 2026
“एकीकडे ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर शहर स्वतःच्या बॅनरने व्यापून टाकले आहे,” असे म्हणत दिपके यांनी फडणीसांवर टीका केली.
CJPचा मोर्चा थेट सरकारी शाळांकडे…
दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी नीट पेपरफुटीनंतर आता आपला मोर्चा थेट सरकारी शाळांकडे वळवला आहे. सरकारी शाळांची दुरवस्था आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात कॉकरोच जनता पार्टीने देशव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी 15 ऑगस्टपासून विशेष मोहीम सुरू होणार आहे. गावातील सरकारी शाळांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी ते स्वतः सरपंचांशी संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:





