Independence Day 2026: पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण ; पहिल्यांदा ‘वंदे मातरम’चे गायन
Independence Day 2026:देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले.

Independence Day 2026: देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधान म्हणाले, “आज प्रत्येक हृदयाचे ठोके ‘वंदे मातरम’च्या लयीत धडकत आहेत. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे.”
त्यासोबतच देश नव्या संकल्पासह प्रगतीच्या दिशेने पुढे जात असल्याचे सांगत महान क्रांतिकारकांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी संकपाळ मोदी असलतील तर सामर्थ्य वाढवता येत त्यामुळे आपले संकल्प कायम मोठी ठेवावीत असे त्यांनी म्हटले . तसेच गेल्या १२ वर्षातसंकल्प आणि सामर्थ्याच्या जोरावर देशाचा विकास झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. Independence Day 2026:
दरम्यान, यंदाचा कार्यक्रम सुद्धा विशेष आहे कारण या प्रसंगी राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. लाल किल्ल्यावरील या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रथमच वंदे मातरमचे औपचारिक गायन करण्यात आले.
Prime Minister Narendra Modi arrives at Red Fort to lead the nation’s 80th Independence Day celebrations
The PM is received by Raksha Mantri Rajnath Singh, Raksha Rajya Mantri Sanjay Seth and Defence Secretary Rajesh Kumar Singh
The Defence Secretary introduces the General… pic.twitter.com/Ri4n8nb9pc
— ANI (@ANI) August 15, 2026
समारंभात देशातील युवाशक्तीची ऊर्जा आणि अपेक्षांवर विशेष लक्ष दिले जात असून 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या प्रवासात युवा पिढीचा कसा वाटा आहे हेही दाखविले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला. पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावर प्रथमच वंदे मातरमचा नाद गुंजला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.






