Prajakta Mali Post : हेच खरं कपल गोल! प्राजक्ता माळीची आईवडिलांसाठी खास पोस्ट, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीने आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. तिने आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. नुकतीच तिने इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिच्या आईवडिलांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दिल्या आहेत.
मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. ती सोशल मीडियावर तिच्या विविध लूकचे फोटो नेहमी शेअर करत असते. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड देखील आहे. याशिवाय प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जे काही आहे ते स्पष्टपणे सांगते.
View this post on Instagram
तिचे चाहते ती लग्न कधी करणार असा प्रश्न तिला सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत असतात. या प्रश्नावर अनेकदा प्राजक्ताने मुलाखतीत भाष्य केले आहे. आई माझ्या वारंवार लग्नासाठी मागे लागते, मी तिला मुलगा शोधायला सांगितलं आहे, असेही प्राजक्ताने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते.
आता सोशल मीडियावर प्राजक्ताने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. “हॅपी अनिव्हर्सरी आई-पप्पा. ४१ वर्षे पूर्ण… आणि अजून खूप वर्षे एकत्र अशीच जावोत. हेच खरं कपल गोल! असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
खरं कपल गोल म्हणजे काय हे प्राजक्ताच्या पोस्टमधून चाहत्यांना कळलंच असेल. प्राजक्ता माळीच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, प्राजक्ताची देवखेळ ही मराठी वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. प्राजक्ताची अंकुश चौधरीबरोबर महत्त्वाची भूमिका आहे. मराठी झी ५ वर ही सीरिज रिलीज झाली असून, तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
हेही वाचा : Manipur violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ; ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, प्रशासनाने कर्फ्यू लागू





