Jitendra Awhad: “हा सत्तेचा माज, जो कायम चालणार नाही….”; सोनम वांगचुक यांना हटवताच जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
Jitendra Awhad : अचानक दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे आंदोलनस्थाळावर तणावाचे वतावरण

Jitendra Awhad : दिल्लीच्या जंतर मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. अचानक पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे आंदोलनस्थाळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलन सुरुच राहणार असल्याची मोठी घोषणा कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे. या संपूर्ण घटनेवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या सर्व घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले. यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.”
“गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसले होते. पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे, जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दिपकेंचा आरोप
दुसरीकडे, अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन ताब्यात घेतलं असा आरोप सोशल माीडियावर पोस्ट करुन केला आहे. सोनम वांगचुक यांनी ‘चलो संसद’चा नारा दिला होता. त्यानुसार २० जुलैला हे आंदोलन निघणार होते. मात्र, ते सध्या रुग्णालयात असल्याने, तुम्ही जंतर-मंतरवर या. इथून आपली चळवळ सुरु राहिलं. ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ”, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी आंदोलनस्थळावरुन केलं आहे. Jitendra Awhad
हेही वाचा:






