Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा थेट पंतप्रधान मोदींवर प्रहार, म्हणाले….
Abhijit Dipke : नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ही आपल्या देशासाठी शरमेची गोष्ट अशा शब्दांत दिपकेंनी मोदींवर हल्लाबोल केला.

Abhijit Dipekh criticizes Modi : सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनस्थळ गाठलं. आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच आजपासून दिपके हे स्वतः आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजीत दिपके यांना अश्रू अनावर झाले. आंदोलनस्थळावरुन अभिजीत दिपकेंनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली.
“नरेंद्र मोदींसारखे वाईट पंतप्रधान कधीच झाले नाही. मुलांवर लाठीचार्ज करतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ही आपल्या देशासाठी शरमेची गोष्ट” अशा शब्दांत दिपकेंनी मोदींवर हल्लाबोल केला. आजपर्यंत आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो. पण नरेंद्र मोदी, आता तुमची पाळी असल्याचे देखील अभिजित दीपके म्हणाले.
Kalki Koechlin: ‘कॉस्मेटिक फिलर्स करून घ्या’… निर्मात्याच्या सल्ल्याने कल्की कोचलिन झालेली अस्वस्थ!
पुढे बोलताना अभिजीत दिपके यांनी मोंदीना काही सवाल केले. ते म्हणाले, २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला, आणि ते कोणावर कारवाई करतात? ते सोनम वांगचुकवर कारवाई करतात. ते कोणावर कारवाई करतात? ते इथे बसलेल्या, मुलांसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करतात आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करतात.
या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आंदोलनस्थळी सरकार चर्चेसाठी येत नाही असा दावा दिपके यांनी याअगोदर बोलून दाखवला होता. ते म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला धर्मेंद्र प्रधानबद्दल काय वाटतं? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचं इतकं संरक्षण का करत आहात? असे एक अनेक सवाल उपस्थित करत अभिजीत दिपकेंनी संताप व्यक्त केला. अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
“मी आजपासून आमरण उपोषण सुरु करत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, मागे हटू नका. ही चळवळ आणखी वाढणार आहे. त्यांनी मोठी चूक केली आहे. मी प्रत्येकाला विनंती करतो की, तुम्ही जंतर-मंतरवर या. इथून आपली चळवळ सुरु राहिलं. ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ” असे आवाहन अभिजीत दिपकेंनी केलं आहे.






