Sonam Wangchuk Wife : “माझ्या संमतीशिवाय कोणतंही औषध…”; सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करताच पत्नीचा इशारा
Sonam Wangchuk Wife : सोनम वांगचुक दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल

Sonam Wangchuk Wife : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना यांचे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर उपोषण सुरू होते. त्यांच्या उपोषणाला 20 दिवस झाल्याने त्यांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर अचानक दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. यानंतर काही काळ आंदोलनस्थळावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सर्व घडामोडीनंतर सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. आंगमो यादेखील सफदरजंग रुग्णालयात पोहोचल्या आहेत. यासर्व घडामोडींवर गीतांजली यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी “माझ्या संमतीशिवाय कोणतंही औषध देऊ नका” असा इशारा दिला आहे.
गीतांजली जे अंग्मो यांची पोस्ट (Sonam Wangchuk Wife)
“मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आलं आहे. माझी, त्यांच्या कुटुंबीयांची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा नसवाटे कोणतंही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत” असं गीतांजली जे अंग्मो यांनी म्हटलं आहे.
I am at Safdarjung hospital in Delhi where @Wangchuk66 has been admitted. Nothing should be administered to him orally or intravenous without take consent from me, his family and his doctors who have been monitoring his health for the past 20 days.
— Gitanjali J Angmo (@GitanjaliAngmo) July 18, 2026
दरम्यान , गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. आज त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Sonam Wangchuk Wife)
अभिजित दीपके उपोषणाला बसणार (Sonam Wangchuk Wife)
दुसरीकडे, दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले. समर्थकांसह आलेल्या दीपके यांनी शनिवारी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली. तसेच, या आंदोलनाच्या समर्थनार्थ 20 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि त्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणाला बसले होते. आता दिपके उपोषणाला बसणार आहेत.
हेही वाचा:
Kalki Koechlin: ‘कॉस्मेटिक फिलर्स करून घ्या’… निर्मात्याच्या सल्ल्याने कल्की कोचलिन झालेली अस्वस्थ!





