“…ही तर फक्त सुरुवात…आणखी विनाश होईल” ; नेतान्याहू यांचा इराणला पुन्हा इशारा

Netanyahu Warns Iran। इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी अंदाधुंद हल्ले सुरू आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग सुरू केल्याबद्दल उघडपणे इस्रायलवर हल्ला केला आहे.
नेतान्याहू यांनी इराणला स्पष्ट इशारा देत, “ही फक्त सुरुवात आहे. अजून विनाश व्हायचा आहे. तो अजिबात सोडला जाणार नाही. इस्रायलच्या अस्तित्वाला इराणने निर्माण केलेला धोका दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा धोका उखडून टाकेपर्यंत ही कारवाई सुरूच राहील” असे म्हणत त्यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
एक व्हिडीओ प्रसिद्ध करत नेत्यानाहू यांनी,”इराणची बर्बर राजवट दशकांपासून इस्रायलच्या विनाशाची उघडपणे धमकी देत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, आम्हाला गुप्तचर माहिती मिळाली आहे की इराण अण्वस्त्रे मिळवण्याच्या जवळ आहे. अलिकडच्या वर्षांत, इराणने नऊ अण्वस्त्रे बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम मिळवले आहे. हा केवळ इस्रायलसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर धोका आहे. आम्ही इराणला अण्वस्त्रे विकसित करू देऊ शकत नाही कारण ते आपल्या देशाच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धोका आहे.”असे म्हटले आहे.
Netanyahu Warns Iran।
امشب، میخواهم با شما، مردم محترم ایران، صحبت کنم.
ما در میانه یکی از بزرگترین عملیاتهای نظامی در تاریخ، هستیم – عملیات طلوع شیران.
رژیم اسلامی که تقریباً ۵۰ سال شما را سرکوب کرده، تهدید به نابودی کشور ما- اسرائیل میکند.هدف عملیات اسرائیل جلوگیری از تهدید هستهای و موشکی… pic.twitter.com/sS5cXgJExi
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) June 13, 2025
नेतान्याहू यांनी यापूर्वी म्हटले होते की. गेल्या काही महिन्यांत, इराणने अशी पावले उचलली आहेत जी त्याने यापूर्वी कधीही उचलली नव्हती. इराण खूप कमी वेळात अण्वस्त्रे तयार करेल. हा काळ एक वर्ष, काही महिने किंवा त्याहूनही कमी असू शकतो. इस्रायलच्या अस्तित्वासाठी हा एक स्पष्ट आणि सध्याचा धोका आहे. ८० वर्षांपूर्वी ज्यू लोक नाझी होलोकॉस्टचे बळी होते. आज आपण हे सुनिश्चित करू इच्छितो की यहूदी इराणच्या अण्वस्त्र नरसंहाराचे बळी ठरू नयेत. आम्ही त्या लोकांना कधीही त्यांच्या विनाशाचे साधन विकसित करू देणार नाही.” असे म्हटले होते .
पुढे ते म्हणाले,”मी माझ्या नागरिकांना शांत राहण्याचे आणि इस्रायली संरक्षण दलाच्या (IDF) होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो. ही लढाई काही तासांची किंवा दिवसांची नाही, तर ती आपली उद्दिष्टे साध्य होईपर्यंत चालू राहील. आपल्याला प्रत्युत्तराला सामोरे जावे लागू शकते आणि आपल्याला यासाठी तयार राहावे लागेल परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आहे आणि आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलू.” असेही नेत्यानाहू यांनी म्हटले होते.
Netanyahu Warns Iran।





