Nilesh Rane | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून टीका करणे भोवलं आहे. कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराविरोधात शिवसैनिक चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “आमच्या आस्थेवर बोलला, आमच्या नेत्यावर बोलला. नको ती भाषा वापरायची नाही. जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार. असा कुठल्या गोष्टी आम्ही सोडणार नाही. सहन केल्या जाणार नाही. कुणाल कामरा आदित्य ठाकरेंचा फंटर आहे. आदित्य ठाकरेंना अशीच लोकं लागतात. कन्टेंट बनवायचे तर चांगलं बनवा. दिशा सालियन मृत्यू प्रकरण झाकण्यासाठी हा प्रयोग असेल,” असे निलेश राणे म्हणाले. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? Nilesh Rane | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे अत्यंत चुकीच आहे, तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचे काम जर कोणी करेल तर हे सहन केले जाणार नाही. अतिशय चुकीचे आहे. कामरानी माफी मागितली पाहिजे आणि तेजस संविधानाच पुस्तक दाखवत आहेत. त्यांनी जर संविधान वाचला असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेले आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की, त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. Nilesh Rane | दरम्यान, कुणाल कामरा रविवारी रात्रीच मुंबई बाहेर रवाना झाला असल्याचे म्हंटले जात आहे. सध्या तो कुठे आहे याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे त्याने आपली सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईतून पलायन केल्याचं सांगितलं जातं. पोलीसांकडूनही कुणाल कामराचा शोध घेतला जात आहे.Nilesh Rane | हेही वाचा: कुणाल कामरा तुझा आबरा का डाबरा करायला वेळ लागणार नाही; पुण्यातील या शिनसैनिकाने दिला इशारा