कुणाल कामरा तुझा आबरा का डाबरा करायला वेळ लागणार नाही; पुण्यातील या शिवसैनिकाने दिला इशारा

Nana Bhangire | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून आक्षेपार्ह टिप्पणी केली. ज्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. इतकेच काय तर संतापलेल्या शिवसैनिकांनी खारमध्ये ज्या ठिकाणी शो पार पडला, त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. स्टुडिओची तोडफोड केली आणि कुणाल कामराला माफी मागण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे. यानंतर राज्यभरातून कामराने केलेल्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. शिंदेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अशातच आता पुण्यातही शिंदे यांच्यावर केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे प्रमोदनाना भानगिरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणाला कामराने वापरेलली भाषा ही अतिशय हिन दर्जाची आणि अशोभनीय भाषा असून वैयक्तिक कोणत्याही नेत्यावर बोलण्याचा अधिकार कुणाला कामराला नाही, अशी प्रतिक्रिया भानगिरे यांनी दिली आहे. तसेच या व्यक्तव्यावर कामराने माफी मागवी अन्यथा त्याला शिवसैनिक वेगळ्या प्रकारे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
काल त्याने (कुणाला कामराने) जे गाण गायलेले आहे, त्या गाण्यात एका लोकप्रतिनिधीचा नाही तर तमाम लोकप्रतिनिधींचा अपमान केला आहे. आमच्या नेत्यावर कुणाला कामराने जी काही भाषणा वापरले त्याचा निषध करतो. भविष्यात असे वक्तव्य केले तर शिवसेनेन अजून वेगळ्या पद्धतीने याला उत्तर दिल्या शिवाय राहणार नसल्ययाचे ते म्हणाले आहेत.
यापूर्वी देखील कामरा आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करणे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला भोवले आहे. कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारी नाही





