“दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आमचे कुंकू पुसले, त्याला हे योग्य प्रत्युत्तर”; संतोष जगदाळे यांच्या पत्नीने व्यक्त केले समाधान

Operation Sindoor | पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. बुधवारी (७ मे) रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हा बदला घेतला आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.
“ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं”
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेवर समाधान व्यक्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रगती जगदाळे म्हणाल्या की, “दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आमचे कुंकू पुसले, त्याला हे एक योग्य प्रत्युत्तर आहे. या ऑपरेशन सिंदूर योग्य नाव दिले आहे. दहशतवाद्यांनी मोदी यांच्या लेकींचे सिंदूर पुसलं. पंतप्रधान मोदी यांना त्याची जाणीव आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं. मी सरकारचे मनापासून आभार मानते,” असे म्हणत त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. Operation Sindoor |
Pune | On #OperationSindoor, Pragati Jagdale, wife of Santosh Jagdale who was killed in Pahalgam terror attack, says, “It’s a befitting reply after the way those terrorists erased the vermilion of our daughters…On hearing the name of this operation, I got tears in my eyes. I… pic.twitter.com/F9AcqHWANk
— ANI (@ANI) May 7, 2025
दरम्यान, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेत मंगळवारी रात्री उशिरा पीओकेमधील मुजफ्फराबाद, मदिरके आणि कोटली येथे एअर स्ट्राईक केली. भारताच्या या हवाई हल्ल्यात 12 दहशतवादी ठार झाले आहेत तर 55 दहशतवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यानंतर आता संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. Operation Sindoor |
दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
भारतीय लष्कराने भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांसाठी संबंधित ठिकाणे निवडली होती. त्यानंतर हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानने कराची आणि लाहोरचे हवाई क्षेत्र ताबडतोब बंद केले. याशिवाय लाहोर आणि सियालकोट विमानतळ पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा:





