Maharashtra Politics : महायुतीला सुरुंग..! भाजप सत्तेतून बाहेर पडणार; शिवसेनेचा प्रचारही करणार नाही, राज्यात खळबळ
Maharashtra Politics : उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद विकोपाला गेला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद तीव्र झाले आहेत. भाजपने महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली असून, आगामी निवडणुकांमध्ये कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सहभागी न होण्याची भूमिका पक्षाच्या नगरसेवकांनी घेतल्याचे वृत्त आहे. (Maharashtra Politics)
स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांपैकी भाजपला संख्याबळानुसार चार जागा मिळणे अपेक्षित असल्याचा भाजपचा दावा होता. मात्र, दोन भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी शिवसेनेच्या पाच आणि भाजपच्या दोन उमेदवारांची नियुक्ती केली. या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला असून, प्रकरण न्यायालयात नेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. (Maharashtra Politics)
या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपने महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics)

दरम्यान, भाजपच्या बैठकीत महापालिकेतील सर्व ३७ नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या आगामी निवडणूक प्रचारात सहभागी न होण्याची भूमिका घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील भाजप-शिवसेना संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून यापूर्वीही दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरण आणि पुढील राजकीय सहकार्याबाबत आता काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





