Bribe Case : एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
Bribe Case : वडाळा येथील एका हायप्रोफाईल गृहनिर्माण प्रकल्पासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देण्याच्या मोबदल्यात १ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) धडक कारवाई केली आहे.

Bribe Case : वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कारवाईदरम्यान ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. (Bribe Case)
सीबीआयच्या माहितीनुसार, वडाळा येथील एका भूखंडावर रिअल इस्टेट समूहाला बांधकाम प्रकल्प उभारायचा होता. या जमिनीवर CPWDचा कोणताही हक्क किंवा दावा नसल्याचे नमूद करणारे NOC आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यकारी अभियंत्याने आपल्या नातेवाईकामार्फत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम ७० लाख रुपये निश्चित करण्यात आली. (Bribe Case)
त्यानंतर सीबीआयने सापळा रचला. कार्यकारी अभियंत्याच्या नातेवाईकाला ५० लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. त्याने ही रक्कम अभियंत्याच्या वतीने रिअल इस्टेट समूहाच्या उपाध्यक्षाकडून स्वीकारल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. (Bribe Case)
लाचेचा व्यवहार सुरू असताना नवी मुंबईतील वाशी येथे उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंत्यालाही सीबीआयने ताब्यात घेतले. तसेच रिअल इस्टेट समूहाचा व्यवस्थापक आणि संबंधित फर्मचा भागीदार यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक झाली आहे. (Bribe Case)
सीबीआयच्या तपासानुसार, ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात अधिकृत पत्रव्यवहार नोंदवहीत नोंद न करता NOC जारी करण्यात आले होते. उर्वरित २० लाख रुपये एका आठवड्यानंतर देण्याचे ठरल्याचा आरोप आहे. (Bribe Case)
दरम्यान, सीबीआयने कार्यकारी अभियंत्याशी संबंधित मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील काही ठिकाणी झडती घेतली. या कारवाईत लाचेच्या ५० लाख रुपयांव्यतिरिक्त सुमारे ५३.८७ लाख रुपयांची रोख रक्कम, स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे. (Bribe Case)
ZP Bribe Case : पत्नीच्या बदलीसाठी १,५०,००० रुपयांची लाच; ZP अध्यक्षांच्या PA ला अटक





