Kalyani Priyadarshan : साऊथमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री रणवीरसोबत झळकणार; आगामी प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट समोर
Kalyani Priyadarshan : सहसा ती हा खास सण कुटुंबासोबत साजरा करते आणि त्या क्षणांची झलक सोशल मीडियावरही शेअर करते. मात्र, यावेळी चित्रिकरणामुळे तिला घरापासून दूर राहावे लागले.

Kalyani Priyadarshan : ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भूत बंगला’ आणि ‘खट्टा मीठा’सारखे गाजलेले चित्रपट दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांची मुलगी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी ‘प्रलय’ या चित्रपटातून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणी सध्या मुंबईत असून ‘प्रलय’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याच दरम्यान तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत गेल्या काही महिन्यांतील आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे तिला यंदा कुटुंबासोबत ओणम साजरा करता आला नाही. सहसा ती हा खास सण कुटुंबासोबत साजरा करते आणि त्या क्षणांची झलक सोशल मीडियावरही शेअर करते. मात्र, यावेळी चित्रिकरणामुळे तिला घरापासून दूर राहावे लागले.
दरम्यान, कल्याणीने मुंबईतील तिच्या आयुष्यातील काही खास क्षणांचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची झलकही पाहायला मिळते. तसेच यावर्षी एप्रिलमध्ये तिने मुंबईत मित्रांसोबत साजरा केलेल्या वाढदिवसाचे काही फोटोही शेअर केले होते.
View this post on Instagram
मात्र, या सर्व फोटोंमध्ये चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते ‘प्रलय’ चित्रपटाच्या स्क्रिप्टने. कल्याणीने फोटोतील एका फोटोत स्क्रिप्टची एक छोटीशी झलक दाखवली आहे. ती लॅप्टटॅापवर स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रलय चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर करताना बघायला मिळणार आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाली अभिनेत्री?
कल्याणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, यंदाच्या ओणमच्या काळात ती मुंबईत ‘प्रलय’च्या कामात पूर्णपणे व्यस्त होती. त्यामुळे तिला कुटुंबासोबत पारंपरिक ओणम साद्याचा आस्वाद घेता आला नाही. तसेच, नेहमीप्रमाणे पांढऱ्या साडीत फोटो काढता आले नाहीत किंवा सणासुदीच्या खास पोस्टही शेअर करता आल्या नाहीत. त्याऐवजी, गेल्या काही महिन्यांतील काही विखुरलेल्या पण खास आठवणींची झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली. तसेच चाहत्यांचा ओणमही आनंदात आणि उत्साहात साजरा झाला असेल, अशी शुभेच्छाही अभिनेत्रीने दिली.
Narali Bhaat: नारळ-गुळाच्या गोडव्याची भन्नाट चव; अश्या पद्धतीने बनवा महाराष्ट्रीयन नारळी भात!





