Laxman Uttekar : ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर लवकरच त्यांच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करणार असल्याची बातमी समोर आली आहे. छावा या सुपरहिट सिनेमानंतर आता उतेकरांच्या पुढच्या सिनेमाची कथाही ऐतिहासिक असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमात बॅालीवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीला मुख्य भूमिकेत कास्ट करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीचे नाव श्रद्धा कपूर असून ती लक्ष्मण उतेकरांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. पिंकव्हिलाने याबाबतचे वृत्त दिलं असून पिंकव्हिला’रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकरांच्या पुढील सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर शास्त्रीय नृत्यात पारंगत नृत्यांगनेची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात श्रद्धा इतिहासातील संस्कृतीचं दर्शन घडवणारी एक मोठी भूमिका साकारणार आहे. मात्र, सध्या तरी या सिनेमाचं नाव अधिकृत जाहीर करण्यात आलं नसून ही भूमिका नक्की काय आणि हा सिनेमा नक्की कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे. याची माहिती अद्यापपर्यंत सांगण्यात आलेली नाही. सध्या श्रद्धा या भूमिकेसाठी विविध डान्स वर्कशॉप करत आहे. इतकंच नाही तर गायनाचेही धडे घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा मोठ्या स्केलवकर बनविण्यात येणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगला नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार असून, पुढीच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा: Prakash Mahajan : “मी असलो नसलो तरी…”; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, मनातलं सगळचं बोलले!