Shraddha Kapoor : श्रद्धाचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल; प्रेमाची दिली कबुली? कॅप्शनमुळे रंगली चर्चा
Shraddha Kapoor : विशेष म्हणजे, तिने हा व्हिडिओ राहुल मोदीलाही टॅग केले होते. त्यामुळे हा व्हिडिओ राहुलनेच शूट केला असावा, असा अंदाज बांधायला चाहत्यांनी सुरुवात केली आहे.

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरला तिचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला मजेशीर डान्स व्हिडिओ. या व्हिडिओमुळे श्रद्धा कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.
श्रद्धाने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध ‘Bad’ गाण्यावर भन्नाट अंदाजात डान्स करताना दिसत आहे. घरातच केलेल्या तिच्या या फ्री-स्टाईल डान्सने चाहत्यांची मने जिंकली असून सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
व्हिडिओइतकंच कॅप्शननेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले, “अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला असं नाचायला भाग पाडेल.” विशेष म्हणजे, तिने हा व्हिडिओ राहुल मोदीलाही टॅग केले होते. त्यामुळे हा व्हिडिओ राहुलनेच शूट केला असावा, असा अंदाज बांधायला चाहत्यांनी सुरुवात केली आहे.
खरंतर श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा २०२४ च्या सुरुवातीपासून सुरू आहेत. एका डिनर डेटनंतर दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये आणि सेलिब्रिटी पार्टींमध्ये हे दोघे एकत्र दिसले. अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येही त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
View this post on Instagram
याआधीही श्रद्धाने राहुलसोबतचा एक खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये श्रद्धा राहुलचा हात धरून ती दिसली होती. तसेच तिच्या गळ्यातील ‘R’ अक्षराचे पेंडंटही चाहत्यांच्या नजरेत भरले होते. त्यामुळे त्यांच्या नात्याला जवळपास अधिकृत मानले जात आहे.
दरम्यान, श्रद्धाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच मराठी लोककलाकार विठ्ठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘इठा’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसेच ‘स्त्री ३’ आणि ‘नागिन’ हे चित्रपटही तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये समाविष्ट आहेत.
हेही वाचा : Menstrual Hygiene Day: मासिक पाळीत स्वच्छता का महत्त्वाची? ‘या’ छोट्या चुका ठरू शकतात संसर्गाचे कारण






