गुपचूप काढलेल्या ‘त्या’ व्हिडिओबद्दल विचारातच गौतमी म्हणते, “दादा दुसरं काही तरी विचारा…’

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिकारी याबाबत सखोल चौकशी करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अनेकांनी हा गौतमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला असून, अद्यापही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, आपल्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आता गौतमी पाटीलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.एका कार्यक्रमादरम्यान तिला याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गौतमी पाटील म्हणाली की, “दुसरं काही तरी विचारा दादा… प्रेक्षवर्ग आपल्यासोबत असल्याचा अभिमान आहे.
कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मला प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. अजूनही अधिक प्रेम मिळत आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय असं त्या म्हणाल्या. पुढे गौतमी म्हणाली, माझी बोलण्याची मनस्थिती नसून तरी मी तुमच्यासमोर आली आहे. दुसरं काहीतरी विचारा दादा. सोशल मीडियावर कमबॅक होत असल्याबद्दल छान वाटतंय. चोरून व्हिडीओ काढल्याबद्दल कायदेशीर कारवाई चालू असून याबाबत मी बोलणार नाही’, असं तिने यावेळी स्पष्ट केलं.





