कॉंग्रेसकडून ‘वंचित’शी ‘हे’ तीन नेते संवाद साधणार ! प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केली भूमिका

धुळे – वंचित बहुजन आघाडीसोबत जागा वाटपासंदर्भात कॉंग्रेसकडून तीन लोक संवाद साधतील, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. यात कोणताही वाद नाही, यासंदर्भात खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला आहे, असेही ते म्हणाले. ते धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे होती.
नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना देखील त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेलं?, असा खोचक सवाल प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला होता. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली व नाना पटोले यांच्याकडील अधिकार काढून घेत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेच. त्यावरून नाना पटोले यांचे पक्षातील वजन विनाकारण कमी केले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरू झाली.
मात्र, कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी कॉंग्रेस पक्षाकडून जागा वाटपासंदर्भात कोणाला अधिकार देण्यात आले, याविषयी स्पष्ट भूमिका केली. चेन्नीथला म्हणाले की, मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्याशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. तसेच एनसीपी, शिवसेना ठाकरे गटासह अन्य मित्रपक्षांशी देखील हे लोक संवाद साधतील, असे स्पष्ट केले.





