नवी दिल्ली : आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि शेअर बाजाराच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची मुदतही या महिन्यात संपणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किमती बदलतात. दोन दिवसांपूर्वी देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा देत केंद्र सरकारने 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मार्केट रेग्युलेटर SEBI ने कंपनीच्या शेअर्सची शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध करण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत कमी केली आहे. म्हणजे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बंद झाल्यानंतर तीन दिवसांपर्यंत केली आहे. आतापर्यंत ही मुदत सहा दिवसांची होती. लवकर सूचीबद्ध करण्याच्या या नवीन नियमामुळे IPO जारी करणाऱ्या कंपन्यांना तसेच त्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांसाठीही सप्टेंबर महिना महत्त्वाचा आहे. वास्तविक, आयकर विभाग 1 सप्टेंबर 2023 पासून रेंट-फ्री होमशी संबंधित नियम बदलणार आहे. यामुळे, उच्च पगार मिळवणारे आणि नियोक्ता कंपनीने प्रदान केलेल्या रेंट-फ्री होममध्ये राहणारे कर्मचारी आता अधिक बचत करू शकणार आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचार्यांचा टेक होम म्हणजेच हातातील पगार वाढणार आहे. समजा एखादा कर्मचारी मालकाने दिलेल्या घरात राहत आहे. त्यासाठीची गणना आता नव्या सूत्रानुसार केली जाणार आहे. कारण दर कमी केले आहेत. याचा अर्थ आता एकूण पगारातून कमी कपात होणार असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा वाढणार आहे. अॅक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 1 सप्टेंबर 2023 विशेष आहे. वास्तविक, पहिल्या तारखेपासून त्याच्या अटी व शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढेच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे १ सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावे लागणार आहे, याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.