‘ही’ आहेत जगातील ‘लय भारी’ विमानतळ, तर ‘या’ देशातील विमानतळ आहे,’सर्वात जास्त निकृष्ट’

तुम्ही जेव्हा विमान प्रवास करता तेव्हा बिजनेस क्लास मध्ये अतिशय उच्च दर्जाच्या सोयी आणि सुविधा दिल्या जातात. मात्र विमानतळावर अनेकदा गैरसोयी, गर्दी व गचाळ वातावरण असू शकते. त्याचे कारण म्हणजे विमानतळांचे व्यवस्थापन वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्या करत असतात.
स्वच्छता सेवा देणाऱ्या कंपन्या, केटरिंगच्या सुविधा देणाऱ्या, कंपन्या रेस्टॉरंट चालवणाऱ्या कंपन्या या सगळ्यांच्या कार्यपद्धतीवर विमानतळाचा एकूण दर्जा ठरत असतो. एकूणच विमानतळांवरील अनुभवांवर प्रकाश टाकण्यासाठी बिजनेस फायनान्सिंग डॉट कॉम या वेबसाईटने जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि निकृष्ट अशा विमानतळांचा सर्वसमावेशक अभ्यास केला आणि त्यावरून विमानतळांची यादी बनवलेली आहे. त्यात अर्थातच ब्रिटन आणि अमेरिकेत निकृष्ट व्यवस्थापन असणारे विमानतळ जास्त आहेत असे दिसून आले.
जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीत स्विर्त्झलंडमधील झुरीच विमानतळ पंधराव्या स्थानावर आहे. या विमानतळाला दहा पैकी 4.57 गुण मिळालेले आहेत.
या यादी चौदाव्या स्थानावर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थान मिळालेले आहे. या विमानतळाला दहा पैकी 4.7 गुण मिळालेले आहेत. तेराव्या स्थानावर सायप्रसमधील लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
या विमानतळाला 10 पैकी 4.85 गुण मिळालेले आहेत. बाराव्या स्थानावर ग्रीसमधील अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थान मिळालेले आहे. या विमानतळाला दहा पैकी 5.06 गुण मिळालेले आहेत. या यादीमध्ये अकराव्या स्थानावर हंगेरीतील बुडापेस्ट येथील फेरेन्क लिझ्त आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश झाला आहे. या विमानतळाला 10 पैकी 5.10 गुण मिळालेले आहेत.
दहाव्या स्थानावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाला 10 पैकी 5.22 गुण मिळालेले आहेत. नवव्या स्थानावर तैवान मधील ताओ युआन आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाला दहा पैकी 5.29 गुण मिळालेले आहेत. आठव्या क्रमांकावर बंगळूर येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
त्याला 10 पैकी 5.56 गुण मिळालेले आहेत. सातव्या क्रमांकावर जपान मधील टोकियो येथील हानेदा विमानतळ आहे. त्याला 5.82 गुण मिळालेले आहेत. सहाव्या क्रमांकावर जपान मधीलच नाडीता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. या विमानतळाला दहा पैकी 6.23 गुण मिळालेले आहेत.
पाचव्या क्रमांकावर फिनलँड मधील हेलसिंकी वांटा विमानतळाचा समावेश होतो. त्याला 6.36 गुण मिळालेले आहेत. चौथ्या क्रमांकावर कतार मधील दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थान मिळालेले आहे. त्याला 6.44 गुण मिळालेले आहेत. तिसरा क्रमांक हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टने पटकावलेला आहे. त्याला 6.48 गुण मिळालेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर मधील चांगी एअरपोर्ट आहे. त्याला दहा पैकी 6.63 गुण मिळालेले आहेत.
सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीमध्ये व्हिएतनामधील हनोई येथील नोएबोई आंतरराष्ट्रीय विमानतळाने पहिले स्थान पटकावलेले आहे. या विमानतळाला 10 पैकी 6.80 गुण मिळालेले आहेत.
अतिशय निकृष्ट सेवा असणाऱ्या विमानतळाच्या यादीमध्ये बेल्जियम येथील ब्रुसेल्स साऊथ चार्लेरोई विमानतळाचा समावेश आहे. या विमानतळाला दहा पैकी केवळ 1.20 गुण मिळालेले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीतील बर्लिन ब्रांडनबर्ग विमानतळाचा समावेश होतो. त्याला 1.56 गुण मिळालेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडमधील लीड्स ब्रॅडफोर्ट विमानतळाचा समावेश आहे. या विमानतळाला दहा पैकी फक्त १.५७ गुण मिळालेले आहेत. चौथ्या क्रमांकावर अमेरिकेतील फ्लोरिडा येथील लोडरडेल हॉलीवुड इंटरनॅशनल विमानतळाचा समावेश आहे. त्याला 1.46 गुण मिळालेले आहेत. पाचव्या क्रमांकावर लंडनमधील मँचेस्टर एअरपोर्ट आहे. त्याला 1.68 गुण मिळालेले आहेत.





