‘या’ आहेत बुद्धीमान व्यक्तींच्या रोजच्या सवयी ; कोणाला वाचन तर कोणाला ‘याची’ आहे सवय… वाचा

बुद्धिमत्ता ही केवळ शैक्षणिक यशातून किंवा उच्च बुध्यांकातून प्रदर्शित होत नाही. अनेकदा व्यक्तीच्या रोजच्या सवयीतून आणि वागण्यातून देखील ती प्रगट होत असते.
स्वीकार आणि जुळवून घेणे – बदलत्या परिस्थितीत नवनवीन गोष्टींचा स्वीकार करणे हे बौद्धिक विचाराचे चिन्ह असते. त्यातून तुम्ही व्यूव्हरचनात्मक दृष्टीने विचार करता आणि नव्या माहितीनुसार तुमच्या नियोजनात किंवा वाटचालीत कार्यपद्धतीत बदल करता.
कुतूहल – उच्च बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती कायम नव्या गोष्टी जाणून घेणे, नवीन ज्ञान संपादन करणे, नवे अनुभव घेणे, नव्या संकल्पनांबाबत सखोल उत्सुकता, कुतूहल दाखवणे अशा पद्धतीने वागत असतात.
प्रयोगशीलता – सतत प्रयोग करण्यातून माणूस प्रत्येक आव्हानांवर पर्याय आणि उत्तरे शोधत जातो. त्यातून त्याचा मार्ग काढण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि एकूणच आजूबाजूच्या वातावरणात सुधारणा करणे आणि नव्या संकल्पना राबवणे यासाठी तो प्रयत्नशील असतो.
श्रवण – खरी बुद्धिमान व्यक्ती नेहमीच सक्रिय श्रोता असते. त्याच्याकडे ऐकून घेण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कसब असते. समोरची व्यक्ती काय बोलत आहे यापेक्षा त्याच्या बोलण्यामागे काय भावना आहेत हे जाणून घेण्याचे असाधारण कौशल्य त्याच्याकडे असते.
स्व जागरूकता – हे एक चांगल्या मानसिक आरोग्याचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. त्यातून त्या व्यक्तीची वैचारिक स्पष्टता आणि अधिक प्रभावशाली विचार पद्धती आणि निर्णय प्रक्रिया दिसून येते.
नेटवर्किंग – आपण नोकरी व्यवसाय करीत असलेल्या क्षेत्रात व्यापक नेटवर्क उभा करणे म्हणजेच विविध लोकांशी संपर्क ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. हे एक उच्च बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.
निरीक्षण – बारीक निरीक्षण हे देखील एक उच्च बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. त्यातून त्या व्यक्तीच्या नजरेतून कुठल्याही गोष्टी सुटत नाहीत. वेगवेगळ्या माहितीचा चांगल्या पद्धतीने वापर करून अधिक अचूक निर्णय घेण्याची क्षमता निरीक्षणातून प्राप्त होत असते.
वाचन – अतिशय उच्च बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींचे सगळ्यात मोठा गुण म्हणजे ते नियमित वाचन करत असतात. त्यातून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे दृष्टिकोन आणि मतमतांतरे समजण्यासाठी तसेच स्वतःचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढतो ज्ञानसंपदा वाढत राहते.
स्वयंशिस्त – स्वतःच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करणे हे या लोकांचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे सर्व प्रकारची शिस्त पाळत असताना वेळेची शिस्त पाळणे हा या लोकांचा सर्वात मोठा गुण दिसून येतो.





