“….त्यामुळे उध्दव ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिलेली नाही, राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती..” ; काँग्रेस, उबाठा अन्… कोणी केली पोस्ट?

Keshav Upadhyay’s post : महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. याला कारणही तसेच आहे, काल काँग्रेसचे बडे नेते भाई जगताप यांनी एक मोठं विधान केले. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे सोडा, पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकप्रकारे मुंबईसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या विधानातून दिले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथ होणार आहे. अशातच आता भाजपने मविआतील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत सणसणीत हल्लाबोल केला आहे.
जोड नही लोड है… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येतील तसतशा मविआतील लाथाळ्या समोर येऊ लागतील. ‘फेव्हीकॉल का जोड है’ नारा देत सुरू झालेला प्रवास आता ‘ये जोड नही लोड है’ पर्यंत येऊन पोहोचला आहे, अशी खोचक टीका केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवरून पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून उद्धव ठाकरेंना काँग्रसेची गरज राहिलेली नाही असे म्हटले आहे. राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती साथ देऊ शकतो, असे वाटू लागलंय. म्हणून दिल्लीवारी ऐवजी आता शिवतीर्थावर फेऱ्या सुरु झाल्या आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
भाई जगतापांनी उबाठा सोबत न जाण्याची भूमिका मांडली. घोळात घोळ हे काँग्रेसचे वैशिष्ट असल्याची टीका केली आहे. आता बिहारमध्ये एकाच मतदार संघात दोघांना उमेदवारी देण्याचा नवा पराक्रम काँग्रेस पक्षाने केला आहे. विरोधकांच्या कोणत्याही आघाडी-युतीला तत्व- विचार नसतो, असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
जोड नही लोड है…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येतील तसतशा मविआतील लाथाळ्या समोर येऊ लागतील. ‘फेव्हीकॉल का जोड है’ नारा देत सुरू झालेला प्रवास आता ‘ये जोड नही लोड है’ पर्यंत येऊन पोहोचला आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्यावर एकदा मुख्यमंत्री पद मिळाले, आता परत मिळणे शक्य…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 23, 2025
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
जोड नही लोड है…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येतील तसतशा मविआतील लाथाळ्या समोर येऊ लागतील. ‘फेव्हीकॉल का जोड है’ नारा देत सुरू झालेला प्रवास आता ‘ये जोड नही लोड है’ पर्यंत येऊन पोहोचला आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्यावर एकदा मुख्यमंत्री पद मिळाले, आता परत मिळणे शक्य नाही, त्यामुळे उध्दव ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिलेली नाही. आता ‘संपलेला पक्ष’ अशी ज्यांची हेटाळणी केली तोच राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती साथ देऊ शकतो, अस वाटू लागलंय. म्हणून दिल्लीवारी ऐवजी आता शिवतीर्थावर फेऱ्या सुरू झाल्या आहेत. म्हणूनच उध्दव ठाकरेंना काँग्रेससोबत जायला नको आहे. त्याचे सुतोवाच ६ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांनी केले होते.
“मविआ ही विधानसभेसाठी आघाडी होती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठी वेगळा पर्याय असेल!” काल भाई जगतापांनी उबाठा सोबत न जाण्याची भूमिका मांडली. घोळात घोळ हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असते. आता बिहारमध्ये एकाच मतदार संघात दोघांना उमेदवारी देण्याचा नवा पराक्रम काँग्रेस पक्षाने केला आहे. विरोधकांच्या कोणत्याही आघाडी-युतीला तत्व- विचार नसतो. केवळ भाजपा विरोध या भूमिकेतून एकत्र आलेली हे पक्ष आहेत. तेव्हा या मविआच काय होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
हेही वाचा : ठरलं तर ! इंडिया अलायन्सकडून तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ; होणार लवकरच घोषणा





