Sambhaji Patil Nilangekar : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दुष्काळग्रस्तांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
लातूर जिल्हा सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या एका वर्षाचे संपूर्ण मानधन देण्याचे जाहीर केले आहे.

Sambhaji Patil Nilangekar : लातूर जिल्हा सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या एका वर्षाचे संपूर्ण मानधन देण्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी दसऱ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी ही घोषणा केली.
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे, तर शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी चारा मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मी माझ्या (Sambhaji Patil Nilangekar) एका वर्षाचे मानधन देऊन एक पाऊल उचलले आहे. हे संकट खूप मोठे आहे, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने यात सहकार्य करावे.
या कठीण काळात प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. या निधीचा वापर प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी, पाणीपुरवठा करणारे टँकर पाठवण्यासाठी आणि जनावरांच्या छावण्यांमध्ये पशुधनासाठी चारा पुरवण्यासाठी केला जाईल, असे निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले.






