पुन्हा होणार धमाल; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

The Great Indian Kapil Show 2| ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. टीव्हीवरील मोठ्या यशानंतर नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आला. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो चा पहिला सिझन हा 13 एपिसोडनंतर संपला होता. हा शो संपेपर्यंत त्याचा पुढचा सीझन कधी येणार याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. द कपिल शर्मा शोचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जेव्हा कपिल शर्माचा शो पहिल्यांदा OTT वर आला तेव्हा क्रिकेट, संगीत आणि मनोरंजन जगतातील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. नीतू कपूर, रणबीर कपूर, रिद्धिमा साहनी, कार्तिक आर्यन, सारा अली खान असे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही न गेलेला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही येथे आला आणि त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले. The Great Indian Kapil Show 2|
Netflix वर कपिलच्या शोचा पहिला भाग 30 मार्च 2024 रोजी प्रसारित झाला, तर शेवटचा भाग 22 जून 2024 रोजी प्रसारित झाला. कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये केवळ 13 एपिसोड्स पाहायला मिळाले. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, द ग्रेट इंडियन कपिल शोचे मंगळवारपासून म्हणजेच उद्या 13 ऑगस्टपासून शूटिंग सुरू होणार आहे.
मात्र, पुढील शोसाठी सेलिब्रिटींची घोषणा अद्याप झालेली नाही. आता आगामी एपिसोड्समुळे कोणते सेलिब्रिटी या शोमध्ये खळबळ माजवणार आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कपिल शर्मा शोच्या पुढच्या सीझनची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. The Great Indian Kapil Show 2|
हेही वाचा:





