Kapil sharma : ‘बॉम्बे’ नाही मुंबई..! मनसेचा कपिल शर्माला कडक इशारा; ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

Ameya Khopkar | Kapil sharma – राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेत असतो, कधी भाषेच्या वादामुळे तर कधी कार्यकर्त्यांच्या दादागिरीमुळे. आता या पक्षाचा एक नेता विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माला इशारा देताना दिसला आहे.
अमेर खोपकर यांनी कपिल शर्मा आणि नेटफ्लिक्सला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या शोमधील बरेच लोक मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणतात, त्यांनी असे करणे थांबवावे. असं ते म्हणाले आहेत.
खरं तर अमेय खोपकरने त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, ‘मुंबईचे नाव ३० वर्षांपूर्वी बदलले गेले आहे, परंतु हिंदी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कपिल शर्मा शोमध्ये अजूनही ‘बॉम्बे‘ हा शब्द वापरला जात आहे.’
बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे.
#BombaytoMumbai
बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत… pic.twitter.com/KKa7TazDJ0— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 11, 2025
१९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे. असं या पोस्टमध्ये लिहलं आहे.
अन्यथा मनसेकडून मोठे आंदोलन केले जाईल.!
अमेय खोपकरने कपिल शर्माला पुढे मोठा इशारा दिला. ‘जर असे झाले नाही तर मनसेकडून मोठे आंदोलन केले जाईल. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणावर बोलत आहोत, मुंबईला बॉम्बे म्हणणाऱ्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल.’
या पोस्टमध्ये अमेयने काही स्टार्सचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते बॉम्बेला मुंबई म्हणताना दिसत आहेत. कपिल शर्माला कोणीतरी इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही काळापूर्वी कॅनडामध्ये कपिलच्या कॅफेमध्ये गोळीबार झाला होता.





