अखेर वाद मिटला! गोविंदा आणि कृष्णा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसले एकत्र

The Great Indian Kapil Show| ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या लोकप्रिय शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदासोबत शक्ती कपूर आणि चंकी पांडेही उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकला भेटणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात गोविंदा आणि अभिषेक एकाच मंचावर एकत्र आल्याचे पाहायला मिळते. अनेक वर्षानंतर हे दोघे एकत्र दिसणार आहेत.
सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गोविंदा कृष्णा अभिषेकसोबतचे त्याचे भांडण जाहीरपणे संपवताना दिसत आहे. प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक गोविंदाला मिठी मारत म्हणतो, “आपण खूप दिवसांनी भेटलो आहोत, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही.” यावरून गोविंदा आणि किकु शारदा त्याची खिल्ली उडवताना दिसतात. The Great Indian Kapil Show|
View this post on Instagram
कृष्णाने २०१६ मध्ये त्याच्या शोमध्ये केलेल्या एका विनोदामुळे गोविंदा नाराज झाला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे हा वाद आणखी वाढला. त्यावेळी दोघांनी माध्यमांतून एकमेकांवर टीका केली होती, मात्र आता त्यांच्यातील वाद संपल्याचे पाहायला मिळाले. The Great Indian Kapil Show|
दरम्यान, यापूर्वी कृष्णा कॉमेडी नाईट्स लाइव्ह नावाचा शो करत होता. ज्यामध्ये त्याने त्याचे मामा गोविंदा यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, परंतु त्यावेळी ते तेथे पोहोचला नव्हता. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले होते. मात्र आता दोघेही एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. The Great Indian Kapil Show|
हेही वाचा:





