देशाला अरुणजींची कमतरता नेहमीच भासेल – नितीन गडकरी

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. अरुण जेटली यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले कि, मी निशब्द झालो आहे. अरुणजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. देशाला त्यांची कमतरता नेहमीच भासेल. राज्यसभेत सत्तेत आणि विरोधात असताना जेटलींनी दिलेली भाषणे सदैव स्मरणात राहतील. दोन ज्येष्ठ नेत्यांचे निधन आपल्या सर्वांसाठीच एक वज्राघात आहे. अरुणजींच्या आत्माला शांती मिळो हीच प्रार्थना, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हमारे दो बड़े नेताओं का एक के बाद हमे छोड़ जाना सभी के लिए वज्राघात जैसा है। अरुण जी की दिवंगत आत्मा को शांति मिले यही प्रार्थना। ॐ शांतिः
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 24, 2019
दरम्यान, अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे उपचाराकरीता दिल्लीतील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.





