‘जैसे थे’चा एकतर्फी प्रयत्न होऊ नये
Updated On:

नवी दिल्ली – सीमेवरील तणाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडत चीनला संदेश दिला आहे.
सीमेवरील म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न होऊ नये, असे भारताने म्हटले.
चीनी कुरापतींमुळे पूर्व लडाखमध्ये एलएसीलगत पाच महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. ती कोंडी फोडण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे.
सोमवारी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेची सहावी फेरी झाली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताची भूमिका मांडली.




